बापरे! विधानभवनाच्या आवारात जुगार!

0

मुंबई,गावाच्या पारावर, शहरातील गल्लीबोळात कुणी पत्ते, जुगार खेळताना दिसले तर पोलिस त्यांची काॅलर धरून घेऊन जातात, विविध कलमांतर्गत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातात. पण ऑनलाईन पत्ते खेळण्यासाठी अधिकृत ऑनलाईन ॲप तयार झालेत, लोक सर्रास जुगार खेळतात. पैसे लावतात, पैसे जिंकतात, पैसे हरतात, त्यावर कोणीच, कोणतीच कारवाई करीत नाही, हा विरोधाभास केवळ गमतीदारच नाही तर कायद्याची थट्टा करणारा ठरत आहे, अशी भूमिका घेत प्रहार चे आ. बच्चू कडू यांनी सरळ सरळ विधान भवनाच्या परिसरात गांधीजींच्या पुतळ्याजवळ पत्ते, जुगार खेळण्याच्या अनोख्या आंदोलनाची घोषणा केली आहे.

बुधवारी सकाळी आ. बच्चू कडू व त्यांचे कार्यकर्ते गांधीजींच्या पुतळ्याजवळ पत्ते खेळणार आहेत.

कायद्यातील हास्यास्पद तफावत जगासमोर आणण्यासाठी आपण हे आंदोलन करीत असल्याचे आ. बच्चू कडू यांनी म्हटले आहे.