20MREG21 बाप्पाच्या मोदकाला महागाईची झळ; काजू मोदक ९२० रुपये किलो
अमरावती, 20 सप्टेंबर : महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे महागाईची झळ बाप्पाच्या प्रसादलाही बसला आहे. त्यामुळे प्रसाद खरेदी करण्यासाठी थोडा अधिक पैसा खर्च करावा लागत आहे.मात्र आपल्या लाडक्या बाप्पासाठी महागाईची झळ भक्त सहन करीत आहे
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मिठाईच्या किंमतीत आठ ते दहा टक्के वाढ केलेली आहे. काजू मोदक, कोकोनट ऑरेंज मोदक, केसरी मोदक,मोतीचूर मोदक,गुलकंद मोदक मलाई मोदक बाजारात आले आहे. चांदीचा अर्क असलेल्या काजू मोदकाची किंमत ९२० रुपये किलो आहे.गणरायाला फळे, मिठाई, घरी केलेला नैवेद्य आरती झाल्यानंतर ठेवला जातो. याशिवाय खास गणेशोत्सवासाठी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार मिठाई देऊन केला जातो. पेढे, मोतीचूर व बुंदीचे लाडू, खवा मोदक, काजू कतली अशा वेगवेगळ्या मिठाई प्रसाद म्हणून दिला जातो.
सार्वजनिक मंडळांमध्ये दररोजच्या आरतीनंतर उपस्थित भाविकांना दिला जाणार अधिकतम प्रसाद हा मिठाईच्या दुकानातून आणण्यात येतो. यंदा कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढल्याने मिठाईच्या दरातही वाढ झाली आहे.
असे आहेत मोदकांचे दर प्रति किलो
काजू मोदक ९२० रु प्रति किलो
खोबरा मोदक ४००रु प्रति किलो
मोतीचूर मोदक २८० रु प्रति किलो
गुलकंद मोदक ४४० रु. प्रतिकिलो
मलाई पेढा मोदक ४८० रु. प्रति किलो













