

मुंबई MUMBAI – आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारामती येथून उपमुख्यमं६ी Ajit Pawar अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, आता या चर्चांना अप्रत्यक्षपणे दुजोरा मिळत आहे. मंत्रालयाबाहेर यासंबंधीचे बॅनर लागलेले असून त्यात ‘सुनेत्रा पवार बारामतीच्या भावी खासदार’ असा उल्लेख करण्यात आला आहे. (Sunetra Pawar to contest LS from Baramati)
मागील दोन ते अडीच महिन्यांपासून ही चर्चा सुरु आहे.
त्यावर अजित पवार यांच्याकडून अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी अजित पवार गटाकडून यासंबंधीचे बॅनर्स झळकत आहेत. बारामती हा खासदार सुप्रिया सुळेंचा लोकसभा मतदार संघ आहे व त्या मतदारसंघातून सुनेत्रा पवारांना उभे करण्याचा विचार अजित पवार गटाकडून सुरु आहे. सध्या गटाकडून याबाबत चाचपणी सुरु असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुलै महिन्यापासून उभी फूट पडली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडले आहेत. अजित पवार यांनी भाजपासह जात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह दिग्गज नेते अजित पवारांसह गेले आहेत. आता लोकसभा निवडणुकीचं घोडामैदानही जवळ आलं आहे. अशात मंत्रालयाबाहेर लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.