


आर्थिक समावेशकतेला गती दिली
बजाज फायनॅन्सकडे पहिल्यांदा आलेले 52% ग्राहक पहिल्यांदाच कर्ज घेणारे कर्जदार आहेत
मुंबई / पुणे, 4 नोव्हेंबर 2025: भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील, नॉन-बँकिंग कर्जदाता कंपनी आणि बजाज फिनसर्व्हचा भाग असलेल्या बजाज फायनॅन्स लिमिटेडने आज सांगितले की, यंदाच्या सणासुदीच्या मोसमात त्यांना ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कर्जांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यांनी यावेळी विक्रमी उपभोक्ता कर्जे वितरित केली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत प्रमाणात 27% आणि मूल्यात 29% जास्त होती.
सणासुदीच्या कर्जांवर GST सुधारणा आणि वैयक्तिक आयकरातील बदलांचा सकारात्मक प्रभाव
ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जांमधील या वाढीतून सरकारच्या नेक्स्ट जनरेशन GST सुधारणांचा तसेच वैयक्तिक आयकरात केलेल्या बदलांचा सकारात्मक परिणाम स्पष्ट दिसतो. उपभोक्त्याची खरेदी करण्याची क्षमता वाढविणे हेच या सुधारणांचे लक्ष्य होते.
22 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर 2025 या कालावधीत बजाज फायनॅन्सने अंदाजे 63 लाख कर्जे वितरित केली. या कालावधीत कंपनीने 23 लाख नवीन ग्राहक मिळवले, त्यापैकी 52% ग्राहक हे पहिल्यांदाच कर्ज घेत होते. अशाप्रकारे आर्थिक समावेशकतेत कंपनीने लक्षणीय प्रगती केली आहे.
बजाज फायनॅन्सचे अध्यक्ष संजीव बजाज म्हणाले, “सरकारने केलेल्या नेक्स्ट जनरेशन GST सुधारणांचा तसेच वैयक्तिक आयकरात केलेल्या बदलांमुळे भारताच्या उपभोग-केंद्रित विकास गाथेला एक नवीन रेटा मिळाला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू अधिक किफायतशीर बनवून सदर उपाययोजनांनी मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या कोट्यावधी कुटुंबांना सणासुदीच्या मोसमात आत्मविश्वासाने खरेदी करण्याचे बळ दिले. हा सकारात्मक प्रभाव केवळ उपभोक्ता कर्ज वितरणात झालेल्या 27% वाढीतून दिसत नाही, तर अधिक चांगल्या जीवनशैलीसाठी उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांकडे वळण्याच्या ग्राहकांच्या वृत्तीमधून देखील दिसतो.”
ते पुढे म्हणाले, “या सणासुदीच्या मोसमात आमच्याकडे आलेल्या नवीन ग्राहकांपैकी अर्ध्याहून जास्त ग्राहक हे पहिल्यांदाच कर्ज घेत होते. आपले पहिले कर्ज या औपचारिक आर्थिक प्राणलीमधून घेण्याचे त्यांनी पसंत केले. बजाज फायनॅन्सचे डिजिटल प्लॅटफॉर्म आणि देशभरातील 4200 ठिकाणी असलेल्या 239,000 सक्रिय वितरण केंद्रांच्या उपस्थिती सह आम्ही आर्थिक समावेशकता अधिकाधिक रुजवण्याचा आणि भारतीय उपभोक्त्याच्या उत्थानाला बळ देण्याचा प्रयत्न करत आहोत.”
प्रीमियमायझेशनचा ट्रेंड दिसून आला; ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कमी किंमतींमुळे लोकांनी प्रीमियम उत्पादनांची खरेदी केली, खास करून टीव्ही आणि एअर कंडिशनर्समध्ये
टेलिव्हिजन आणि एअर कंडिशनर्सवरील कमी GST मुळे ग्राहक आपल्या कर्जांच्या सरासरी तिकीट साइझमध्ये 6% घट करू शकले आहेत आणि त्याचबरोबर उच्च गुणवत्तेची उत्पादने खरेदी करू लागले आहेत. टेलिव्हिजनसाठी देण्यात आलेल्या कर्जात प्रीमियमायझेशनचा ट्रेंड स्पष्ट दिसून आला आहे. कंपनीने टीव्हीसाठी दिलेल्या एकूण कर्जापैकी 71% कर्जं 40-इंच किंवा त्यापेक्षा मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीसाठी आहेत. गेल्या वर्षी हे प्रमाण 67% होते.
एक वैविध्यपूर्ण, टेक-प्रेरित नॉन-बँकिंग कंपनी असलेल्या बजाज फायनॅन्सचे लक्ष निरंतर इनोव्हेशनवर केंद्रित आहे, जेणेकरून ग्राहकांची कर्जापर्यंतची पोहोच वाढावी आणि ग्राहक व व्यवसाय यांना कर्जाचा चांगला अनुभव मिळावा. या आघाडीच्या उपभोक्ता कर्ज प्रदाता कंपनीची मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती उपकरणे, फर्निचर, रूफटॉप सोलर पॅनल्स आणि इतर अनेक उपभोक्ता-केंद्रित श्रेणींमध्ये लक्षणीय उपस्थिती आहे.
बजाज फायनॅन्स आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि ऑन-ग्राउंड वितरण केंद्रांच्या माध्यमातून 110 मिलियन ग्राहक फ्रँचाईजला सेवा प्रदान करते. अधिक पारदर्शकतेसाठी ही कंपनी आपल्या ग्राहकांना 19 भाषांमधून कर्ज कराराचा एक भाग म्हणून की-फॅक्ट स्टेटमेंट प्रदान करते. 30 जून 2025 रोजीच्या आकडेवारीनुसार बजाज फिनसर्व्ह अॅप 75.1 मिलियन लोकांनी इन्स्टॉल केले आहे. हे अॅप कर्ज, ठेवी, विमा आणि गुंतवणूक याबाबत निर्बाध अनुभव आणि जलद पोहोच प्रदान करते.
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये जाहीर केलेल्या नेक्स्ट जनरेशन GST सुधारणांपासून ‘GST बचत उत्सव’ सुरू झाला. हे सरकारने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल होते, ज्याच्यामुळे कर्ज संरचना सोपी झाली, कर कमी झाला आणि कुटुंबावरील ओझेही कमी झाले. यामुळे, लोकांना आपल्या आकांक्षा पूर्ण करता येणे शक्य झाले, तर उद्योजक, व्यापारी आणि MSMEs यांना व्यापार करण्यात सुलभता आली. 2017 मध्ये GST दाखल केल्यानंतरच्या या सर्वात मोठ्या सुधारणा होत्या. GST दरांची पुनर्रचना आणि 2025 मध्ये आयकरात करण्यात आलेली कपात यांचा उद्देश भारतीय कुटुंबांची खरेदी करण्याची क्षमता वाढविण्याचा आणि समावेशक वृद्धीच्या भारताच्या व्हिजनला बळकटी देण्याचा होता.
















