

नरखेड (Narkhed) :- तालुक्यातील परसोडी (राऊत) येथे पोळा साजरा करण्यात आला. यावेळी बाबुराव पाटील राऊत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट बैलजोडी ला बक्षीस देण्यात आले.
यावेळी सरपंच अशोक राऊत, राजेंद्र राऊत, विनोद राऊत, जगदीश राऊत, यशवंत राऊत, श्रीकांत मनकवडे ,बाळा धवड, दिलीप राऊत, अजय राऊत, शिवाजी राऊत, राजू ठाकरे, यांच्या उपस्थितीत बैलजोडी ची पूजा करून बैल जोड्याच्या सेवकांना बक्षिस म्हणून कुकर, दुपट्टा, नारळ, देउन सन्मान करण्यात आला. यावेळी गावातील सर्व बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या. ही परंपरा अनेक वर्षापासुन अशी सुरू आहे. यावेळी परिसरातील वरिष्ठ मंडळी, महिला मंडळी ,बालगोपाल उपस्थित होते.
Narkhed wikipedia
Narkhed distance
Narkhed tourist places
Narkhed famous for
Narkhed Taluka map
Narkhed population 2024
Narkhed Vidhan Sabha
Narkhed Pin Code