संसदेत बहुजनांचा आवाज बुलंद करणार

0

वंचितचे राजेश बेले यांचा निर्धार

गुरुवारी प्रकाश आंबेडकरांच्या सभा

चंद्रपूर(Chandrapur):भारतातील वंचित बहुजनांचा आवाज संसदेत बुलंद व्हावा म्हणूनच वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या मैदानात उतरली असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात वंचितचे उमेदवार असलेले राजेश बेले यांनी केले आहे.
शंखनाद न्यूज चॅनलशी बोलताना बेले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांच्या चंद्रपूर, गडचांदूर, वणी येथील जाहीर सभेची माहिती दिली. गुरूवार दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता गडचांदूर येथे, सायंकाळी पाच वाजता चंद्रपूर येथे त्यांची जाहीर सभा होऊ घातली आहे.
बहुजन समाजाचा विकास व्हावा आणि त्यांचा आवाज संसदेत बुलंद करता यावा, बेरोजगारी, शिक्षणाचे खाजगीकरण, शेतमालाला योग्य भाव, प्रदूषण, प्रकल्पग्रस्तांना न्याय, अशा विविध विषयांवर वंचित बहुजन आघाडीचे लोक लढा देत आहेत. अशा स्थितीत या पक्षाचा विजय हेच आमचे ध्येय असल्याचे ते म्हणाले.