

बदलापूरच्या आंदोलनाची सत्य कहाणी सांगणारी, बदलापूर कर आणि शाळेचा माजी विद्यार्थी असलेल्या व्यक्तीने लिहिलेली हकीकत. वाचा आणि प्रसारित करा. मी बदलापूरचा रहिवासी असल्याने, त्याचं दिवशी लिहीलं होतं की, हे आंदोलन नाही काहीतरी वेगळा प्रकार आहे.
——————————————————————-
मी राजकीय विषयावर बोलायचं नाही असं ठरवलं होतं. पण कालचा प्रकार झाला तेव्हा पालक व बदलापूर मधील नागरिकांनी शाळे समोर एकत्र जमून ठिय्या आंदोलन करायचं ठरलं होतं. मी स्वत: माॅर्निंग वाॅकला न जाता सकाळी ६.३० वाजता शाळेच्या गेटवर हजर होतो. तिथे दोन ते तीन हजार पालक व इतर माणसं हजर होती. जोरदार घोषणाबाजी व निदर्शने चालू होती. पोलिस बंदोबस्त पण खूप होता. नंतर स्वतः पोलीस कमिश्नर बालवडकर साहेब आले. त्यांनी सर्व पालकांना शांत केले. आत्तापर्यंत अक्षय शिंदे या नराधमावर काय काय ॲक्शन घेतली याची माहिती दिली. तसेच शाळेने सुद्धा प्रिन्सिपल, वर्गशिक्षिका व २ सेविका यांच्यावर काय कारवाई केली याची सुद्धा माहिती दिली. गुन्हेगारावर पोक्साॅच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात गुन्हा चालवण्यासाठी गृह मंत्रालय पावले उचलीत असल्याचे सांगितले. पिडीत मुलिंना व त्यांच्या कुटूबियांना पूर्ण पणे न्याय देण्याचे आश्वासन दिले. बऱ्याच पालकांचे समाधान झाल्यावर ते ९-१० वाजेपर्यंत घरी सुद्धा परतले. त्यानंतर काही अतिउत्साही समाजकंटकांनी या आंदोलनाचा ताबा घेतला व रेल्वे स्टेशन गाठले. त्यातच त्यांच्याबरोबर काही उरलेले पालक होते तेही तिथे गेले. या लोकांनी रेल्वे ट्रॅक मध्ये उतरून धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्याला काही हुल्लड रेल्वे प्रवाशांनी सुद्धा साथ दिली. मग रेल्वे पोलीस येऊन लोकांना समजवायला लागले व ट्रॅक खाली करण्यासाठी विनंती केली. परंतु हुल्लडबाज लोकांनी त्यांचं ऐकलं नाही व उलट पोलिसांवर दगडफेक सुरु केली. मग मात्र तिथून उरल्या सुरल्या पालकांनी सुद्धा पळ काढून ते बाहेर पडले. आता तिथे राहिले होते ते फक्त हुल्लडबाज आणि राजकारण्यांनी पाठवलेली दंगलखोर माणसे. ज्यांनी पोलिसांवर दगडफेक तर केलीच पण शाळेत घुसून मुलांच्या सर्व शालेय साहित्याची वाट लावली. तसेच शाळेची संपूर्ण इमारत फोडली. कुठला पालक आपल्या मुलांच्या शाळेवर दगड उचलेल आणि नुकसान करेल ? तसेच कुठला पालक पोलिसांवर दगड उचलेल ? तर हे पालक नसून केवळ राजकारणाची पोळी भाजणारे दंगेखोर होते. लक्षात घ्या दहा तासानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. कारण दहा तासापासून ६ एक्सप्रेस मधले लांब जाणारे प्रवासी व त्यांची लहान मुले यांचे खूप हाल झाले होते. त्यामुळे अखेर पोलिसांना लाठी चार्ज करून दंगलखोरांना पांगवणे भाग पडले. इथे काहीतरी मोठा हादसा होऊन एक दोन माणसांचा गोळीबारत मृत्यू व्हावा हीच अपेक्षा राजकारण्यांची होती. परंतु पोलिसांनी खूप संयम राखून परिस्थिती हाताळल्यामुळे राजकारण्यांचे मनसुबे फसले. त्यामुळे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते दंगेखोरच होते आणि आहेत. यामध्ये कोणीही विद्यार्थ्यांचे पालक नाहीत. ही मी प्रत्यक्ष बघितलेली गोष्ट आहे. आजकाल कोणत्याही गोष्टीला राजकीय रंग देऊन आपली पोळी भाजून घ्यायची सवय राजकारणी लोकांना लागली आहे. आणि या प्रसंगावर खास पोस्ट तयार करून लोकांची दिशाभूल करायची हा मोठा धंदा झाला आहे. यथावकाश चौकशी अंती सर्व सत्य बाहेर येईलच. तोपर्यंत सत्य जाणून मगच आपली प्रतिक्रिया देणे योग्य होईल. आज मी सुद्धा या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. शाळेच्या संस्काराचा पगडा आमच्या संपूर्ण जीवनशैली वर आहे. शाळेच्या संचालक मंडळात सुद्धा माजी विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. शाळेची तब्बल १५ एकर जागा संचालक मंडळा पैकी एका संचालकाच्या वडीलांनी त्या काळात शाळेसाठी दान केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एवढी मोठी जागा असलेली ही एकमेव शाळा आहे. म्हणूनच राजकारण्यांचा या शाळेच्या जागेवर डोळा आहे. त्यामुळे शाळेच्या माजी शिक्षकांनी व माझे विद्यार्थ्यांनी मिळून शाळेसाठी भक्कम दगडी भिंत बांधायला आपापल्या परीने वर्गणी दिली आहे. हि केवळ शाळा नसून बदलापूरातील हजारो आजी-माजी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा आत्मा आहे. त्यामुळे असे निच कृत्य करणाऱ्या नराधमाला संचालक मंडळ कधीच पाठिशी घालणार नाही असा विश्वास पालकांना, विद्यार्थ्यांना आणि बदलापूरकरांना नक्कीच आहे. त्यामुळे ते रेल रोको, दगडफेक असले उद्योग करणार नाहीत. त्यामुळे त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रश्नच येत नाही. रेल्वे पोलिसांकडे सर्व CCTV फुटेज आहेत. त्याप्रमाणे ते कारवाई करतील ती पुराव्या सकट कोर्टात सादर करतीलच. पण तोपर्यंत या शाळेवर एका नराधमामुळे आलेले संकट लवकरच दुर होवो ही समस्त आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक , पालक व बदलापूरकर नागरीकांची इच्छा आहे.
सुहास ह. सावंत,
मेघनिनाद सोसायटी, बेलवली.