बल्लारपूरला निघाली अयोध्या धाम अक्षत कलश यात्रा

0

नागपूर -चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे वस्ती विभागात गोविंद बाबा मंदिर येथून अयोध्या धाम अक्षता कलश यात्रा उत्साहात काढण्यात आली. या यात्रेचा समारोप श्रीराम मंदिर गांधी चौक बल्लारपूर येथे झाला.
अयोध्याधाम येथून आलेल्या कलश मधील अक्षताचे वितरण येणाऱ्या दिवसात घरोघरी करण्यात येणार असून, अक्षतेसोबत अयोध्या येथे तयार झालेल्या श्रीराम मंदिराचा फोटो व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पत्र सुद्धा देण्यात येणार आहे.
22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या धाम येथे गर्भगृहात श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत. त्या ठिकाणी होणाऱ्या आरतीच्या वेळेस, ह्या अक्षता आपापल्या परिसरातील मंदिरात सकाळी: 11 ते 12.30( आरती झाल्यानंतर) वाजेपर्यंत देवाच्या मूर्तीला वाहण्यात येणार आहे.
या अक्षता कलश यात्रेत परिसरातील असंख्य स्त्री-पुरुष समाविष्ट झाले होते. शेवटी श्रीराम मंदिर परिसरात फ्रुटीचे वितरण करण्यात आले.