“आव्हाड भ्रमिष्ट झाले”..हसन मुश्रीफही संतापले

0

कोल्हापूर  Kolhapur : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार Vijay Vadettiwar यांच्यानंतर आता राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही जितेंद्र आव्हाड  Jitendra Awad यांच्यावर बोचरी टीका केली आहे. भाजप आणि शिंदेंसोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचा पुढाकार होता, असे सांगताना त्यांना पक्षात कोणीही विचारत नसल्याचे मुश्रीफ म्हणाले. पक्षात एकाकी पडल्यामुळे आव्हाड भ्रमिष्ट झाले आहेत, असेही मुश्रीफ म्हणाले. Hasan Mushrif
जितेंद्र आव्हाडावर एकेरीवर येऊन टीका करताना मुश्रीफ म्हणाले की, यालाच सगळे कळतेय का? जितेंद्र आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाहीत. एकाकी पडल्यामुळे ते भ्रमिष्ट अवस्थेत आहेत. आमची सत्ता पहिल्यांदा गेली तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांच्या सोबत जावे यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी आमदारांनी सह्या केल्या होत्या व त्या पेपरवर जितेंद्र आव्हाडांची सही एक नंबरला होती. माझा भाजपसोबत जायच्या निर्णयाला विरोध असता तर मी मंत्रीपदाची शपथ घेतली असती का? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला आहे. हसन मुश्रीफ यांचा भाजपसोबत जाण्यास विरोध होता, असा दावा आव्हाडांनी केला आहे.