‘लेखक आपल्या भेटीला’ 6 ऑगस्ट रोजी

0

नागपूर (Nagpur), 5 ऑगस्ट
विदर्भ साहित्य संघातर्फे घेण्यात येणार्‍या ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात मुंबईचे सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार आणि अनुवादक सुनील तांबे रसिकांना भारतीय उपखंडाची सैर घडवणार आहेत. मंगळवार, 6 ऑगस्ट रोजी त्यांचे आगामी पुस्तक ‘मान्सून ः जन, गण आणि मन’ यातील निवडक भागाचे ते वाचन करणार आहेत.

सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या संदर्भ ग्रंथालयात सायंकाळी 4.30 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मान्सूनच्या मोसमी वार्‍यावर स्वार होऊन भारतीय उपखंडाची सैर केली तर देशातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात, या भूमिकेतून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

श्रोत्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारी मंडळाने केले आहे.