AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव

0

ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी

Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 over Game: Australia vs Pakistan 1st T20I: कांगारू संघाने गाबाच्या ऐतिहासिक मैदानावर पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील ७ षटकांच्या पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानला २९ धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ षटकांत ९३ धावा करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. तर नंतर कांगारू गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला.

पाकिस्तानी संघाने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली असताना तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्यांची सुरुवात अतिशय लाजिरवाणी झाली. या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला गेला तो पावसामुळे विस्कळीत झाला, त्यामुळे सामना खूप उशिरा सुरू झाला आणि तो ७-७ षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ७ षटकांत ४ गडी गमावून ९३ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघ ७ षटकात ९ गडी गमावून केवळ ६४ धावाच करू शकला आणि त्यांना या सामन्यात २९ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

 

Pak shaheen vs aus 2024
Pak shaheen vs aus live
pakistan-australia match
PAK vs AUS live match
Cricket AUS vs pak
Pakistan vs Australia Today match
Pak vs AUS live score T20 2024
Pak vs Australia match