Hasan Mushrif औरंगजेब हा आपला शत्रूच, त्याचे उदात्तीकरण शक्यच नाही-हसन मुश्रीफ

0

कोल्हापूर : KOLHAPUR  औरंगजेब आपला कधीच होऊ शकत नाही, त्याचे उदात्तीकरण होऊच शकत नाही, असे असे मत माजी कामगार मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेते हसन मुश्रीफ (Senior NCP Leader Hasan Mushrif) यांनी व्यक्त केले आहे. कागलमधील परिस्थितीवरून त्यांनी औरंगाजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांना कडक शब्दात फटकार लगावली. हसन मुश्रीफ म्हणाले की, औरंगजेबचे उदात्तीकरण कधीच होऊ शकत नाही, हे मुस्लिम कुटुंबांनी आपल्या मुलांना समजावून सांगणे गरजेचे आहे. त्यांना इतिहास समजून सांगणे गरजेचे आहे. औरंगजेब हा आपला शत्रूच आहे. त्याचे उदात्तीकरण होऊच शकत नाही, असे मुश्रीफ म्हणाले.

मुश्रीफ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम समाजाबद्धल आकस नव्हता. २२ वतनदार आणि सैन्याचे प्रमुख अधिकारीही मुस्लिम होते. त्यामुळे त्यांच्या सैन्यात किती मुस्लिम असतील, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कोल्हापूरमधील दंगल गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूरमधील वातावरण बिघडत आहे, असे ते म्हणाले. कागलमध्ये एका तरुणाने टिपू सुलतानचे स्टेटस लावल्याचे व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. कागल पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.