


हिंगणघाट (Wardha) : – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धा जिल्हाध्यक्ष पदी अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीने वर्धा जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आनंद, उत्साह व नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर नियुक्ती पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, फ्रंटल सेलचे प्रमुख आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत वर्धा जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली.
अतुल वांदिले हे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटत असतात, समाजकार्य, संघटन कौशल्य आणि राजकीय दूरदृष्टी यासाठी ओळखले जातात. तसेच विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत जनतेच्या समस्या मांडल्या असून, ग्रामीण भागातील युवकांना राजकारणात सक्रीय होण्यासाठी प्रेरित केले आहे.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे, यांनी त्यांच्या कार्यकौशल्याचा गौरव करत,”अतुल वांदिले’ यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती ही संघटन बळकट करण्यासाठीचा ठोस निर्णय आहे,” असे मत व्यक्त केले.
या नियुक्तीमुळे वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षात अधिक संघटित व जनतेच्या प्रश्नांवर लढा देणारा पक्ष म्हणून उभा राहील, असा विश्वास अतुल वांदिले व्यक्त केला आहे. वर्धा जिल्हाध्यक्ष नियुक्तीने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण अभिनंदनांचा वर्षाव! जिल्ह्यातील सर्व तालुके, नगरपंचायती, नगरपरिषदा आणि ग्रामीण भागातून अतुलभाऊंच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत असून, सोशल मीडियावर अभिनंदन संदेशांचा वर्षाव होत आहे. अनेक कार्यकर्त्यांनी “ही योग्य व्यक्तीला मिळालेली योग्य जबाबदारी आहे” असे म्हणत पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत. यावेळी माजी आमदार सुनिल भुसारा, माजी वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिल राउत, भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे उपस्थित होते.