महिलेवर प्राणघातक हल्ला करून बलात्काराचा प्रयत्न

0

अहमदनगर(Ahmednagar), 22 मे बलात्काराचा प्रयत्न करुन महिलेवर प्राण घातक हल्ला करणाऱ्या गुंडांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली.याप्रकरणी मातंग समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष सुनील उमाप,चंद्रकांत काळोखे,अनिल शेरकर,गणेश पेटारे,पंडित सुडे,सुनिल सकट,प्रेम गाडे,श्रीरंग अडागळे,पवन अडागळे,पुष्पा शिंदे,सुरेखा शिंदे,सिंधू शिंदे आदींसह समाज बांधव उपस्थित होते. मातंग समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,पिडीत महिला राहुरी तालुक्यात राहते.सदर महिलेस आरोपी अक्षय दाभाडे,सुनील दाभाडे,शंकर दाभाडे,विनोद दाभाडे व सतीश दाभाडे यांनी मारहाण व शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हे दाखल आहेत.

आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने प्रतिबंधक कारवाई न केल्यामुळे आरोपींचे मनोधैर्य वाढलेले असून,त्यामुळे हा प्रकार घडलेला आहे.१८ मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेला आरोपींनी शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती.याप्रकरणी महिलेने राहुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली होती.परंतु त्या घटनेकडे पोलीसांनी दुर्लक्ष केल्याने त्याचा गैरफायदा घेत रात्री दोनच्या सुमारास पीडित महिला घराबाहेर झोपलेल्या असताना आरोपीने त्या महिलेसोबत झोपेतच अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.महिला झोपेतून जागे झाली व अब्रू वाचावी म्हणून आरडाओरडा सुरू केला.

आरोपींनी त्या महिलेला शारीरिक संबंधाची मागणी करू लागले.महिने शारीरिक संबंधास नकार दिल्याने हल्लेखोरांनी दारूच्या नशेत महिलेच्या डोक्यावर कोयत्याने वार करून रक्तबंबाळ केले.आरोपींचा महिलेला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न होता.आजूबाजूच्या लोकांचा आवाज ऐकून हल्लेखोर त्या ठिकाणाहून पळून गेले.जखमी महिलेला पोलीस स्टेशनला घेऊन गेले.परंतु पोलिसांनी पुढील उपचारासाठी शासकीय हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले.पोलिसांना या सर्व घटनेची माहिती दिल्यानंतर सुद्धा पोलिसांनी अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे संशय निर्माण झालेला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महिलेस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व त्याचबरोबर बलात्काराचा प्रयत्न आणि सदर पीडित महिलेच्या गळ्यातले सोन्याचे चार ग्राम दागिने सुद्धा काढून घेतल्याप्रकरणी हल्लेखोराविरुद्ध गुन्हे दाखल व्हावे,हल्लेखोरांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्या कार णाने त्यांच्यावर तडीपारची कारवाई व्हावी.या घटनेमागे एका वाळू तस्कराचा सुद्धा प्रमुख हात असल्याने त्याला पण सहआरोपी करण्याची मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.