उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच हल्ला!

0

 

कसाबसा वाचवला जीव; नेमकं काय घडलं?

(Chandrapur)अतिदक्षता विभागात गंभीर आजारी असलेल्या आठवर्षीय मुलीवर उपाचार करणाऱ्या डॉक्टरवर दोघांनी हल्ला केला. अचानक झालेल्या हा प्रकारामुळे घाबरलेल्या डॉक्टरने पळ काढून आपला जीव वाचवल्याचे बोलले जात आहे. यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत उपचार करण्यात आले. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा डॉक्टरांनी निषेध व्यक्त करीत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हा प्रकार चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी रात्री अकरा वाजता घडला. अधिक माहितीनुसार, डॉ. रोहित तोरे हे अपघात विभागात रात्री अकरा वाजता रुग्णावर उपचार करीत होते. त्याचवेळी चंद्रपुरातील नगिना बाग, दुर्गापूर येथील दोघांनी साजिद शेख व सुलतान खान हे दोघे तेथे आले. आपल्या मुलीच्या पोटात खूप दुखत असून, उपचार करण्याची त्यांनी विनंती केली. अपघातग्रस्तावर उपचार केल्यानंतर डॉ. होरेंनी मुलीवर उपचार करणे सुरू केले. याचवेळी उशीर झाल्याचा आरोप करत त्या दोघांनी होरेंना मारहाण करण्यास सुरुवात केली.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे रुग्णालयात एकटे असलेल्या व घाबरलेल्या डॉ. होरेंनी तेथून पळ काढला. यानंतर शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. (Thanedar Satish Singh Rajput) ठाणेदार सतीशसिंह राजपूत हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी (Sajid Sheikh) साजिद शेख व (Sultan Khan)सुलतान खान या दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अनेक शिकाऊ डॉक्टरांनी एकत्र येत या प्रकाराचा निषेध केला. तत्परता दाखवत उपचार सुरू केल्यानंतरही शिवीगाळ आणि मारहाण होत असेल तर हा अतिरेकाचा कळस झाल्याची तीव्र प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली.

आठ महिन्यांत दुसरा प्रकार

चंद्रपुरात डाॅक्टरांना मारहाण करण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठ महिन्यांत दोनदा असा प्रकार घडला आहे. यामुळे डॉक्टरांत भीतीचे वातावरण आहे. चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाल्यानंतर अनेक रुग्णांसाठी हे महाविद्यालय आशेचा किरण ठरले आहे. पण असे असतानाही मारहाणीच्या प्रकारात वाढ होत असल्याने मनोबल खचल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

रुग्णालयात मारहाण झाल्यानंतर डॉक्टरांनी तीव्र संताप व्यक्त केला. वैद्यकीय महाविद्यालयात दररोज जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरील हजारो रुग्ण येतात. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात येतो. मात्र, काही माथेफिरूंमुळे डॉक्टरांसह इतर रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो. असे प्रकार रोखण्यासाठी महाविद्यालयात सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे.