

महाराष्ट्रात आज मतदानाचा उत्सव
आज महाराष्ट्रात लोकशाहीचा मोठा सण साजरा होत आहे, कारण राज्यभर एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या शांततापूर्ण मतदानाला गालबोट लागण्याची घटना घडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे मास्तर यांना त्यांच्या मांडवा गावात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. कराळे मास्तरांनी भाजप कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे.
या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून संबंधित घटनेबाबत तपास सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, मतदारांनी शांततापूर्ण वातावरणात मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.