महाराष्ट्रात आठवलेंना हव्या दोन जागा

0

मुंबई- एनडीएमध्ये निमंत्रक किंवा संयोजक पदावरून कोणताही वाद नाही. आम्हाला देशभरात लोकसभेच्या दहा जागा मिळाव्यात. त्यातील दोन जागा महाराष्ट्रातील मिळाव्यात, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी केली.
आठवले यांनी सांगितले की, राज्यात ज्या दोन जागा आम्ही मागत आहोत त्यात शिर्डी आणि सोलापूर या जागांचा समावेश आहे. शिर्डीमधून आपण स्वत: लोकसभेची निवडणूक लढवणार आहोत. याशिवाय देशातील इतर भागातही आम्ही काही जागा मागितल्या असल्याचे आठवले यांनी सांगितले. दरम्यान, आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मागणी केल्याने शिवसेनेचे विद्यामान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासमोर अडचण निर्माण होणार आहे.