

नागपूर (Nagpur )– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी काल रात्री शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केल्यानंतर सोमवारी सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. रविवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचार दौऱ्यात सहभागी झाल्यानंतर आज रामटेक लोकसभा मतदारसंघातील प्रचार दौऱ्यासाठी ते सहभागी होणार आहेत.
आज चंद्रपूर येथे तर 10 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची सभा होत आहे. या दृष्टीने पूर्व नियोजनासाठी ही बैठक असल्याची माहिती आहे.यावेळी खासदार कृपाल तुमाने (MP Kripal Tumane),आमदार टेकचंद सावरकर (MLA Tekchand Savarkar), माजी आमदार आशिष देशमुख ,भाजप सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.