सध्या मी कोणत्याच आघाडीत नाही-बच्चू कडू

0

अमरावती : सध्या मी महायुती किंवा महाआघाडी अशा कोणत्याही बाजुने नाही, असा दावा प्रहार जनशक्ती पार्टीचे (Prahar Janshakti Party) आमदार बच्चू कडू यांनुी केला आहे. आमदार कडू यांनी अमरावती मतदारसंघावर दावा केला आहे. अमरावतीची जागा प्रहारच्या वाट्याला यावी किंवा नवनीत राणा यांनी प्रहारच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, असे कडू यांनी म्हटले आहे.
बच्चू कडू म्हणाले, अमरावतीमध्ये प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. इतर पक्षाचे तेवढे नाहीत. म्हणून अमरावती लोकसभेची जागा प्रहारला मिळाली पाहिजे. एकतर अमरावतीची जागा प्रहारला मिळावी नाहीतर नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी. त्यांच्याशी अजून कुठलीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.