मोदींबरोबरच भाजपा संघटनेचाही विजय

0

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व आंध्र प्रदेश  Madhya Pradesh, Rajasthan, Chhattisgarh and Andhra Pradesh विधानसभांच्या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचा झालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi  यांच्या लोकप्रियतेचा विजय तर आहेच पण त्याबरोबर भाजपाच्या संघटित बुथप्रणालीचाही विजय आहे असे म्हणावे लागेल.एक्झिटपोलचे निष्कर्ष हाती आल्यानंतर लिहिलेल्या ता.क.मध्ये मी मोदींचा करिश्मा कायम असल्याचे विधान केले होते.आतापर्यंतच्या कलांवरून ते अतिशय स्पष्ट झाले आहे.मी हा मजकूर साडेबारा वाजता लिहित आहे.यावेळी मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये भाजपाला सरकार बनविण्याची संधी मिळणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.आंध्रप्रदेशात काॅग्रेसला सरकार बनविण्याची संधी मिळणार हेही स्पष्ट झाले असले तरी तेथे बीआरएसला थोड्या अधिक जागा मिळाल्या असल्या तर तेथेही बीआईएस व भाजपाचे संयुक्त सरकार बनण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असती.अर्थात राजकारणात आणि निवडणुकीत जरतरला काहीही अर्थ नसतो हेच खरे आहे. Assembly Elections 

या निवडणुकीच्या हालचाली जेव्हा सुरू झाल्या तेव्हा त्या भाजपाला जड जातील असे वातावरण होते.कारण नुकत्याच आटोपलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदीनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावूनही पक्षाला विजय मिळविता आला नव्हता.पण पक्षाने त्या पराभवापासून बोध घेऊन यावेळी कुठलीही कसर बाकी ठेवायची नाही या निर्धाराने व्यूहरचना केली.तिचा परिणाम म्हणजे हा विजय होय.या वेळचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाजपाने कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता.एवढेच नाही तर काही केंद्रीय मंत्र्यासहीत काही खासदारानाही मैदानात उतरविले होते.या व्यूरचनेचाही या विजयात मोठा वाटा आहे.

रविवारी मतमोजणीच्या प्रारंभी असे चित्र होते की, भाजपाला मध्यप्रदेश व राजस्थानात तर विजय मिळेल पण छत्तीसगडमध्ये मिळण्याची शक्यता कमी वाटत होती.पण शेवटचा वृत्त हाती आले तेव्हा छत्तीसगड भाजपाने विजयाच्या दिशेने मुसंडी मारल्याचे चित्र निर्माण झाले होते.आंध्रप्रदेश काॅग्रेसला संधी देईल असे प्रारंभापासूनच चित्र होते.तेही साकार झाले आहे.तेथे बीआरएसने कच खाल्ली म्हणून अन्यथा तेथेही बार्सेलोना संयुक्त सरकार तयार होण्याची शक्यता निर्माण झाली असती.

रविवारी दुपारी साडेबारा वाजता हा मजकूर मी लिहित आहे.त्यावेळी मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तिन्ही राज्यात भाजपाच्या बहुमताचा आणि आंध्रप्रदेशात काॅग्रेसच्या बहुमताचा संकेत मिळत होता. मतमोजणी अद्याप सुरूच असली तरी अंतिम चित्र यापेक्षा वेगळे राहण्याची शक्यता दिसत नाही. मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये प्रारंभापासूनच विजयाचा संकेत मिळत होता पण छत्तीसगडमध्ये भाजपाने कमाल केली.तेथे तो पक्ष केव्हा पुढे गेला व नव्वदपैकी चौपन्न जागांवर स्थिरावला हे कुणाच्या लक्षातही आले नाही.आंध्रप्रदेशात तर बीआरएस चाळीसच्या पुढे सरकतच नव्हती.त्या मानाने भाजपाची स्थिती बरी होती.दोन जागांपर्यंत उतरल्यानंतर तो पक्ष दहा जागांवर स्थिरावलेला दिसतो.
या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीना 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले होते.विरोधी पक्ष ऐक्याचे प्रयत्न करीत असताना मोदींच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते.राहुल गांधी तर याबाबतीत खूपच आघाडीवर होते.पण निवडणूकप्रचाराच्या निमित्ताने मोदींनी ते आव्हान स्वीकारले व विरोधकांचा नॅरेटीव उध्वस्त करण्यात घवघवीत यश संपादन केले.

ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर