


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते सुब्बिया नल्लामुथु यांना प्रदान करणार
एशियाटिक बिग कॅट सोसायटी आणि वन्यजीव शाखा, वन विभाग, महाराष्ट्र (Maharashtra) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा पहिला राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर सुब्बिया नल्लामुथु यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त (International Tiger Day) मंगळवार, २९ जुलै 2025 रोजी 2 वाजता मुंबई येथे होणा-या या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री. सुब्बिया नल्लामुथु यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल आहे. या कार्यक्रमात ‘वाइल्ड ताडोबा’ या माहितीपटाच्या ट्रेलरचा जागतिक प्रीमियर देखील सादर केला जाणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनमंत्री गणेश नाईक राहणार असून सन्माननीय अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य सचिव (वने) भा.प्र.से. श्री. मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) भा.व.से. शोमिता बिस्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) भा.व.से. व्ही. आर. तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण) भा.व.से. एम. श्रीनिवास रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) भा.व.से. संजीव गौर, प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण भा.व.से विवेक खांडेकर यांची उपस्थिती राहील.या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन एशियाटिक बिग कॅट सोसायटीचे डॉ. अजय पाटील आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) भा.व.से. एम. श्रीनिवास राव यांनी केले आहे.
Related posts:
‘संघ गंगा के तीन भगीरथ’ नाटकाचा सुवर्ण महोत्सवी ५० वा प्रयोग संपन्न
October 15, 2025MAHARASHTRA
'मिसाईल मॅन' डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना महावितरणचे अभिवादन
October 15, 2025Breaking news
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती
October 15, 2025Social