अशोक चव्हाण अखेर भाजपात

0

 

(Mumbai)मुंबई– नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघ सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोमवारी दिल्यानंतर आज मंगळवारी दुपारी (Ashok Chavan)अशोक चव्हाण अखेर (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (BJP State President Chandrasekhar Bawankule) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपवासी झाले. त्यांच्यासोबत आ अमर राजूरकर यांनीही भाजपात प्रवेश घेतला. उद्या चव्हाण राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. गेले अनेक दिवस त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. ही एक नवी सुरुवात आहे.

आपण जिथे असलो तिथे प्रामाणिकपणे काम केले. कॉंग्रेसमध्ये होतो तेव्हा प्रामाणिकपणे काम केले. कुठलेही पद मी मागितले नाही. मला कुणावर टीका करायची नाही. काँग्रेसने मला खूप दिले पण मी पण पक्षासाठी खूप केले.आता भाजपात जी जबाबदारी दिली जाईल ती सांभाळणार देशात मजबूत आहेच राज्यातही भाजप मजबूत करू असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी दोनदा मुख्यमंत्री असलेले चव्हाण मोठे, राष्ट्रीय नेते असल्याचे स्पष्ट केल्याने केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांच्या राज्यसभेबाबत निर्णय निश्चित मानला जात आहे.