

नागपूर: काँग्रेसमधून निष्कशित करण्यात आलेले नेते डॉ. आशिष देशमुख हे पुन्हा भाजपवासी होणार आहेत. 18 जून रोजी नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात देशमुख यांची भाजपवापसी होणार आहे.
कोराडी येथील नैवेद्यम नॉर्थस्टार येथे रविवारी सकाळी 10 वाजता आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांच्या उपस्थितीत आशिष देशमुख भाजपमध्ये पुन्हा प्रवेश घेणार आहे. यावेळी नागपूर ग्रामीण भाजपचे अध्यक्ष अरविंद गजभिये यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. तेव्हापासूनच देशमुख यांच्या भाजपवापसीची चर्चा सुरू झाली होती. अशीष देशमुख यांनी थेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला होता. त्यापायी काँग्रेसने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
















