
वर्धा- वर्ध्यात आशा व गटप्रवर्तकांनी आपल्या मागण्यांसाठी खासदार रामदास तडस यांच्या घरी धडक दिली.
प्रशासन व सरकारने दखल न घेतल्याने आशा व गटप्रवर्तक कर्मचारी आक्रमक आहेत. खासदार रामदास तडस यांच्या वर्ध्यातील निवासस्थानी धडक देत त्यांनी निवेदन दिले.
शेकडो महिलांचा धडक मोर्चात सहभाग असून गेल्या सतरा दिवसांपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे
यावेळी घोषणाबाजी करत महिलांनी परिसर दणाणून सोडला. अर्चना घुंगरे, आशा गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव, दिलीप उटाणे, आयटक राज्य उपाध्यक्ष यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.