


भंडारा (Bhandara) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी २४ जून रोजी भंडारा येथे ५४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले. कार्यक्रमांच्या उद्घाटनाप्रसंगी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी कार्यक्रमस्थळी येऊन निषेध व्यक्त केला. त्यांनी मुख्यमंत्री मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना कार्यक्रमस्थळाहून बाहेर काढले. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या आगमनाप्रसंगी महामार्गावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाहनापुढे काळे झेंडे दाखवून निषेध केला. (Eknath Shinde gosekhurd prakalp Bhandara district)
सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा जिल्ह्याच्या दौºयावर असताना त्यांनी ५४७ कोटींच्या कामांचे भूमिपूजन केले. गोसेखुर्द प्रकल्पावरील जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी कार्यक्रम स्थळी मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच व्यासपीठापुढे घोषणा देणे सुरू केले. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या आगमनाप्रसंगी महामार्गावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाहनापुढे काळे झेंडे दाखवून निषेध केला. कार्यक्रमाला मुख्यमंत्री तब्बल ३ तास उशिरा पोहोचले. मात्र कार्यक्रमस्थळी उपस्थित नागरिकांसाठी कुलर आणि पाण्याची देखील सोय नसल्याने सगळ्यांनी आयोजकांच्या नावाने संताप व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ
मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या कामामध्ये जलपर्यटन केंद्र १०२ कोटी, भूमिगत गटार योजना १३० कोटी, भंडारा, पवनी तलाव सौंदर्यीकरण १०३ कोटी, रस्ते बांधकाम ७५ कोटी, नगरपालिका विकास कामे १ कोटी, पवनी नगरपालिका विकास कामे ९५ कोटी, भंडारा क्रीडा संकुल ७२ कोटी, तुमसर मार्ग चौक रस्ता सुधारणा ४० कोटींच्या कामाचा समावेश आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा जिल्हा दौºयाकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांना दौºयात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या नाराजीला तोंड द्यावे लागले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देऊन शासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. मुख्यमंत्री कार्यक्रमाला उशिरा आल्याने जमलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दौरा होता. त्यामुळे या दौºयाकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री नागपूरहून भंडाºयाकडे गेले. त्यामुळे नागपुरातही मोठ्या प्रमाणात त्यांचे फलक लावण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीची तयारी शिंदे यांनी सुरू केली असून त्यांनी पूर्व विदर्भावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते.
—
बोट बुडाल्याची अफवा
भंडारा जिल्हा दौºया दरम्यान जल पर्यटन करताना प्रसारमाध्यमांचे १० ते १५ प्रतिनिधी एका बोटीत होते. हे सर्व माध्यम प्रतिनिधी नागपूरचे असल्याचे सांगण्यात आले. एका बोटीत मुख्यमंत्री तर दुसºया बोटीत माध्यम प्रतिनिधी होते. काही अंतरावर गेल्यानंतर माध्यम प्रतिनिधींची बोट एका खडकावर आदळून तिचे तीन तुकडे झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मात्र भंडारा पोलिस अधीक्षकांनी एक खुलासा जारी करत बोट बुडाल्याची घटना घडलीच नसल्याचे म्हटले आहे़