

अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) : पेमा खांडू यांनी सलग तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
इटानगर, (Itanagar,) १३ जून : अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी आज (गुरुवारी) पेमा खांडू यांनी शपथ घेतली. पेमा खांडू हे सलग तिसर्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन हॅट्ट्रिक केली आहे. राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
यासोबतच चौना में यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शपथविधी साेहळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh), केंद्रीय मंत्री जेपी नड्डा (Union Minister JP Nadda), किरेन रिजिजू आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Assam Chief Minister Himanta Biswa Sarma) यांची प्रमुख उपस्थिती होती.
पेमा खांडू यांची बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड झाली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकूण ६० जागांपैकी ४६ जागांवर विजय मिळाला आहे.
कोण आहेत पेमा खांडू ?
अरुणाचल प्रदेश राज्यातील भाजपचा चेहरा अशी ४४ वर्षीय पेमा खांडू यांची ओळख आहे. दिल्लीतील हिंदू विद्यालयात त्यांनी पदवी घेतली. २००५ मध्ये अरुणाचल प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव म्हणून त्यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात केली. २०१० मध्ये ते तवंग जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष झाले. त्याचे वडील काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे २०११ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. पेमा खांडू २०१६ मध्ये मुक्तो विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले. १६ जुलै २०१६ राजी त्यांची काँग्रेस विधानसभा पक्ष नेता म्हणून निवड झाली. काँग्रेसच्या नबाम तुकी यांच्या सरकारमध्ये ते जल संसाधन व पर्यटन मंत्री होते.