

सर्व स्वामीसमर्थ भक्तांना कळविण्यात आनंद होत आहे की दरवर्षीप्रमाणे या वर्षी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, आयोजित श्री स्वामी समर्थ पादुका व पालखी परिक्रमेचे आगमन दिनांक १९ मे २०२४ रविवार संध्याकाळी ६.०० वा. सिद्धारुढ शिव मंदीर, रामनगर चौक (बाजी प्रभू देशपांडे चौक,) रामनगर, नागपूर(Nagpur) येथे होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्याने सर्व स्वामी भक्तांसाठी त्यादिवशी स्वामींच्या चरित्र सारामृत पोथीचे पारायण करावयाचे योजीले आहे. ज्या भक्तांना पारायण करायचे असेल त्यांनी आपले नांव व मोबाईल नंबर खाली नमूद मोबाईल नंबर वर संपर्क साधून वा मेसेज करून दिनांक १७/५/२४ पर्यंत कळवावे.
जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी व उपासकांनी ह्या पारायण सेवेत भाग घ्यावा व आपली सेवा त्याच दिवशी अक्कलकोट येथून येणार्या स्वामींच्या पालखी पादुका चरणी अर्पण करावी ही नम्र विनंती. असा योग दुर्लभ असून ह्याचा लाभ सर्व स्वामी भक्तांनी घ्यावा व इतर भक्तांनाही ह्या पारायण सोहळ्यात सहभागी करून घ्यावे ही नम्र विनंती.
कार्यक्रम:-दि.१९/५/२४
स्थळ – श्री सिद्धारूढ शिव मंदीर,रामनगर चौक, रामनगर,नागपूर
विशेष उपस्थिती:-कलर्स मराठी वाहिनीवरील “जय शंकर जय योगेश्वर” ह्या मालिकेत तसेच “ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ”ह्या महानाट्यामधे श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे सिनेकलावंत श्री अशोक कुळकर्णी.
वेळ संध्या.५.० ते ७.३० पर्यंत
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पोथीचे पारायण.
वेळ -दुपारी ३.०० ते ६.००
श्री स्वामी समर्थ पादुका व पालखी आगमन व श्रींची पाद्यपूजा वेळ – संध्या. ६.०० ते ६.३०
श्री स्वामी समर्थ उपासना मंडळ प्रस्तुत स्वामी उपासना.वेळ – संध्या. ६.३० ते ८.००.
श्री स्वामींची महाआरती. वेळ – रात्री.८.०० वा.
महाप्रसाद. वेळ – रात्री.८.३० ते १०.३० पर्यंत.
दि.२०/५/२४ सकाळी ६.३० ते ८.०० पर्यंत श्री स्वामी समर्थ पादुका अभिषेक.
सकाळी ८.३० वा.पालखीचे वर्धेसाठी प्रयाण