

गोंदिया (Gondia) :- विकासाची दूरदृष्टी असणारा नेता मनोहर चंद्रिकापुरे म्हणून पाहिले जाते. चौवीस तास केवळ अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास होईल या दृष्टीने ते प्रयत्नशिल असतात. या क्षेत्राचा चौफेर विकास हाच त्यांना एकमेव ध्यास आहे. आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडे प्रत्येक समस्येवर औषध आहे, असा लोकांचा समज झाला आणि त्यांनी लोकांचा हा विश्वास सार्थदेखील ठरवला. याद्वारे अनेकांच्या समस्यादेखील सुटल्या. त्यामुळेच ते अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी ठरले आहेत. ते ज्या गावात दौरा करतात, त्यांच्याकडे लोक अपेक्षेने धावून येतात. कुठलीही व्यक्ती रिकाम्या हाताने परत जाऊ नये, यावर त्यांनी किंबहुना त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कटाक्षाने भर दिला. गेल्या दहा वर्षांपासून ते राजकारणात आहेत. त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे.
स्पष्टवक्ता असल्याने व त्यांना सामाजिक जाण असल्याने त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख सतत उंचावत आहे. सुरुवातीची पाच वर्षे त्यांनी कुठलेही पद नसताना अपार मेहनत केली, हे त्यांचे राजकीय विरोधकही खासगीत मान्य करतात. त्यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडून देखील आले. सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्यांतील ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून त्यांना उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचे काम त्यांनी केले आहे. पर्यटन, झाशीनगर उपसिंचन योजनेचे रखडलेले कामदेखील येणाऱ्या काळात मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव या क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी ते प्रयत्नरत आहेत.