
मुंबई दि.15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पालघर जिल्हा माहिती अधिकारी तथा कोकण विभागाच्या प्रभारी उपसंचालक प्रसिद्ध लेखिका अर्चना गाडेकर – शंभरकर ( वय ५२ ) यांचे दीर्घ आजाराने बुधवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.२० मिनिटांनी अपोलो हॉस्पिटल मुंबई येथे निधन झाले. त्या मूळच्या चंद्रपूर येथील रहिवासी होत्या.
त्यांच्या पश्चात पती प्रकाश शंभरकर, मुले डॉ.अप्रतिम व रीची शंभरकर, वडील भगवान गाडेकर,भाऊ डॉ. हेमंत गाडेकर, भाऊ अभिनेता जयंत गाडेकर, बहिण डॉ. मोना व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
उद्या दिनांक १६ ऑक्टोबर रोजी १०१, वसुंधरा सीएचएस, युगंधरा टॉवर, खारघर सेक्टर ८
खारघर स्टेशन रोड लिटल वर्ल्ड जवळ, नवी मुंबई या त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव दुपारी १२ वाजता पासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता नंतर खारघर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अर्चना शंभरकर या प्रसिद्ध लेखिका होत्या. त्यांची ‘सोलमेट’ ही कादंबरी तर ‘सारीनास’ हा लघुकथा संग्रह प्रसिद्ध झाला होता. विदर्भातील सुप्रसिद्ध कवियित्री दिवंगत विमल गडेकर यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या.
संपर्क : डॉ. जया चांदोरकर 9819221311
संपर्क : जयंत गाडेकर 9869213009
















