

नागपूर- आज विधिमंडळात महाराष्ट्रातल्या जनतेला ज्या गोष्टीची प्रतीक्षा आहे, त्या मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होणार आहे.winter session
सभागृहात सर्व आमदारांची एकमुखी मागणी आहे की आज आरक्षणावर चर्चा होईल.कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षणाचा मु्द्दा कायमचा निकाली काढा अशी मागणी शिवसेनेचे आ अजय चौधरी यांनी केली आहे.
मराठा आरक्षण ही काळाची गरज आहे आणि त्यांना ते मिळाले पाहिजे याबाबत सर्व आमदार आग्रही आहेत.
मराठा आरक्षणासाठी बाळासाहेबांनी हा संदेश पहिल्यांदा महाराष्ट्राला दिला होता. बाळासाहेबांची पहिल्यापासून घोषणा होती,घाटी कोकणी वाद टाळा.
कुठेही वाद न करता मराठी म्हणून सर्वांनी एकत्र या. मराठ्यांना सरकार कशाप्रकारे आरक्षण देईल हे आता त्यांच्या उत्तरातून येईल असे
अजय चौधरी माध्यमांशी बोलताना म्हणाले.