
गोंदिया – गोंदिया जिल्हा हा धानाचा जिल्हा अशी महाराष्ट्रमध्ये ओळख आहे. मात्र, आज धानाची शेती नुकसानीत जात असताना गोंदिया जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क बोराची शेती केली असून या बोराच्या शेतीने त्या शेतकऱ्याला लखपति बनवले आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक तालुक्यात असलेल्या ग्राम शिंदेपार येथील शेतकरी प्रवीण देवदास काबगते या शेतकऱ्याने ही किमया केली आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण १० एकर शेतात बोरांची झाड़े लावली आहे. अॅप्पल बोर, ग्रीन अॅप्पल बोर, काश्मिरी बोर तर बाल सुंदरी बोर संपूर्ण १० एकरात लावले आहेत. आता त्यांना या सर्व प्रक्रियेत या शेतकऱ्याला १२ लाख रुपये खर्च आला आहे. मात्र, १ महिन्यात त्यांना ८ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. हंगामासाठी दोन महिने शिल्लक असून सुमारे पंचवीस ते तीस लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे.