Sushma Andhare: अपने इलाके मे तो कुत्ता भी शेर होता है!

0

अमरावती (Amravti) 11 ऑगस्ट

तुम्ही बांगड्या फेकल्या म्हणजे फार मोठा पराक्रम दाखवला का? अख्ख्या मराठवाड्यात राज ठाकरे ला फिरायला लोकांनी जागा ठेवली नाही जाल तिथे नाकेबंदी केली, तुम्हाला तुमचा दौरा गुंडाळावा लागला,अस वक्त्यव्य शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अमरावती येथे बोलताना व्यक्त केले. अपने इलाखे मे तो कुत्ता भी शेर होता है.. मजा तो तब है इलाका तुम्हारा धमाका हमारा असेही त्या म्हणाल्या.

अमरावती शहराच्या सांस्कृतिक भवन मध्ये स्व.मा साहेब मीनाताई ठाकरे स्त्री शक्ती सन्मान पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी उपस्थिनांना सँबोधित करतांना आपले मत व्यक्त केले.  अंधारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)व मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray)यांच्यावर जोरदार टीका केली.

जा एकनाथ शिंदें बहिणीला लाडकी बहीण म्हणता आणि त्याच बहिणीच्या हातातल्या बांगड्याना कमी समजता, म्हणजे तुमचं प्रेम बेगळी आहे, तुम्ही महिलांचा सन्मान करत नाही असेही त्या म्हणल्यात

बांगड्या फेकल्या म्हणजे आम्ही विचलित होऊ असं काही नाही श्री शक्तीचा सन्मान म्हणजे बांगड्या आहे,ज्यांनी हे हॉलच्या बाहेर नाटक केलं त्यांना प्रश्न आहे की मराठवाड्यात तुम्हाला काय झालं होतं? विदर्भात काय झालं होतं ठाण्यात कसं काय आठवलं?ठाण्यात तुम्ही तुमच्या कंट्रोल सिच्युएशन मध्ये, एकनाथ शिंदे यांची मदत मिळू शकते