‘अपना’चा अॅडव्‍हांटेज विदर्भसोबत सामंजस्‍य करार

0

नागपूर (Nagpur), ९ फेब्रुवारी २०२५
विदर्भातील रोजगाराच्या संधींना बळकटी देण्यासाठी आणि व्यवसायांना सक्षम बनवण्याच्या धोरणात्मक प्रयत्‍नांसाठी ‘अपना’ या भारतातील अग्रगण्य नोकरी आणि व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्मने, असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID) नागपूर द्वारे आयोजित केलेल्या ॲडव्हांटेज विदर्भ 2025 सह सामंजस्य करार केला.

या सामंजस्य करारावर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, श्री नितीन गडकरी यांच्‍या उपस्‍थ‍ितीत एआयडीचे अध्‍यक्ष आशीष काळे व ‘Apna.co’ चे संस्थापक आणि सीईओ निर्मित पारीख व उपाध्यक्ष डॉ. प्रीत दीप सिंग यांनी स्वाक्षरी केली.

एमएसएमई, स्टार्टअप्स आणि अॅडव्‍हांटेज विदर्भ उपक्रमात सहभागी होणाऱ्या उद्योग संघटनांसाठी कर्मचाऱ्यांचा विकास, नियुक्त करण्याच्या पद्धती आणि व्यवसाय वाढ करण्‍याच्‍या उद्देशाने हा करार करण्‍यात आला असून यामुळे विदर्भातील रोजगारामध्‍ये लक्षणीय वाढ होणार आहे, असे निर्मित पारेख यांनी म्‍हटले आहे.