अभिवादन शेवाळकर’ त्रि-दिवसीय महोत्सव 1 मे पासून

0

श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टतर्फे भव्‍य आयोजन

नागपूर (Nagpur), 29 एप्रिल

श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टतर्फे ‘अभिवादन शेवाळकर’ या त्रिदिवसीय महोत्सवाचे येत्‍या, 1 ते 3 मे 2025 दरम्‍यान दररोज सायंकाळी 6.30 वाजता भव्‍य आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस नागरिकांना नाट्य, व्याख्यान आणि गाण्यांची मैफल असे विविध कार्यक्रमांचा आस्‍वाद घेता येणार आहे. हा महोत्सवाचे मार्गदर्शक विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी आहेत.

व्हॉलिबॉल मैदान, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर येथे गुरुवार, 1 मे रोजी अभिव्यक्त, पुणे प्रस्तुत ‘त्या तिघी’ हे एकपात्री नाटकाने महोत्‍सवाला प्रारंभ होईल. स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या पतीच्या राष्ट्रकार्याची धुरा निष्ठेने सांभाळणार्‍या सावरकर घराण्यातील वीरांगनांची शौर्यगाथा सांगणा-या या एकपात्री नाटकाची संकल्पना, संहिता लेखन, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शन व सादरीकरण अपर्णा चोथे यांचे असून संगीत अजित यशवंत यांचे तर प्रकाशयोजना संकेत पारखे यांची आहे.
शुक्रवार, 2 मे रोजी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि वक्ता डॉ. परीक्षित सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान होईल. ते आपल्‍या तेजस्‍वी वाणीने छत्रपती संभाजी महाराजांच्‍या जीवनकार्यावर प्रकाश टाकतील. शनिवार, 3 मे रोजी सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांची मराठी-हिंदी गाण्यांची मैफल होणार आहे. या कार्यक्रमाला रोज नागपुरातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

महोत्‍सवातील सर्व कार्यक्रम निःशुल्क असून रसिकांनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहावे, असे श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट, झिल्पी तर्फे करण्‍यात आले आहे.