टोरंटो-भारतातून कॅनडात पळून गेलेल्या आणखी एका खालिस्तान समर्थक गँगस्टरची कॅनडाच्या पिनीपेग शहरात हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधून कॅनडात पळालेल्या या या गँगस्टरचे नाव सुखदूल सिंग उर्फ सुख्खा दुनके असे होते. प्रतिस्पर्धी टोळीतील लोकांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. (Pro Khalistan Gangster killed in Canada) सुक्खा हा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंह उर्फ अर्श दलाचा राईट हँड होता. एनआयएच्या वॉन्टेड यादीतही त्याचा समावेश होता. सुक्खा कॅनडामध्ये बसून भारतातील आपल्या गँगच्या गुडांमार्फत अपहरण आणि खंडणी उकळण्याचे काम करायचा, असे सूत्रांनी सांगितले. तो भारतात गुन्हे करुन पळून गेला होता. पंजाब पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांवर त्याला मदत केल्याचा आरोप होता.
Related posts:
रेलवे पुलिस की तत्परता से महिला यात्री को मिला खोया हुआ बैग
October 25, 2025MAHARASHTRA
कळमेश्वर गोंडखैरी उड्डाणपूलास मंजुरी-डॉ. राजीव पोतदार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
October 23, 2025MAHARASHTRA
मध्य भारत में दवा और रसायन उद्योगों को बढ़ावा देने के लिए नागपुर में सीडीएससीओ कार्यालय स्थापित करें
October 23, 2025Breaking news













