
मुंबई-शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत शिवसेनेच्या Uddhav Thackeray उद्धव ठाकरे गटाचाच विजय होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होईल, असा दावा ठाकर गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी (Former MP Chandrakant Khaire) केलाय.
माजी खासदार खैरे यांनी केलेल्या दाव्यानुसार, विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल. आमची सत्याची बाजू आहे. कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंचाच विजय होईल, असे ते म्हणाले. या निकालाविषयी आम्ही जेव्हा उच्च व सर्वोच्च न्यायालयातील विविध न्यायाधीश व सर्व तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करतो, त्यातून हे 16 आमदार अपात्र ठरणार असल्याचा निष्कर्ष येतो. त्यामुळे ते 100 टक्के अपात्र होतील. त्यांच्या मित्र पक्षाचे काही लोकही हाच दावा करत आहेत, असे खैरे म्हणाले. Another political earthquake in Maharashtra, Thackeray group claims