Acident समृध्दी महामार्गावर पुन्हा अपघात

0

(Collision between travels and trucks)ट्रॅव्हल्स आणि ट्रकमध्ये धडक

(Nagpur)नागपूर :समृध्दी महामार्गावर फुलंब्री हद्दीमध्ये (Mumbai)मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या बसला पाठीमागून ट्रॅव्हल्स बसने धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
सुदैवाने (Highway Police Maharashtra Security Force)महामार्ग पोलिस महाराष्ट्र सुरक्षा दल यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत बचाव कार्य सुरु केले. या मध्ये कोणतिही जीवित हानी झाली नाही, पण या अपघातात नागपुरातील प्रवाशांसह १० प्रवासी गंभीर जखंमी झाले आहेत. इतर ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अशी प्राथमिक माहिती समृद्धी महामार्ग पोलिसांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रात्री २.३० च्या सुमारास नागपूरवरून पुण्याला जात असलेली लक्जरी बस क्रमांक MH 38 X 8027 ही ट्रक ट्रॅक्टर क्रमांक MH 21 BH 3516 ला भरधाव वेगाने पाठीमागून धडकली. या मध्ये बसच्या संपूर्ण कॅबिनचा चुराडा झाला आहे.