पशुसंवर्धन सचिवांची हेटीकुंडी येथील गवळाऊ प्रक्षेत्रास भेट

0

 

वर्धा (Wardha):- राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव डॉ.रामास्वामी एन यांनी कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी येथील गवळाऊ प्रजनन प्रक्षेत्रास भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मुकणे, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ.सतीश राजू, डॉ.बेदरकर उपस्थित होते.

यावेळी डॉ.रामास्वामी व अन्य मान्यवरांनी गवळाऊ प्रजनन प्रक्षेत्राची पाहणी केली. हेटीकुंडी येथे शासनाने भ्रूण प्रत्यार्पण प्रयोगशाळेसाठी ६ कोटी रुपये मंजूर केले आहे. या निधीतून होत असलेल्या कामाची सचिव डॉ.रामास्वामी यांनी पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. तसेच गवळावू प्रक्षेत्राच्या कामकाजाची पाहणी करून प्रक्षेत्रावर सोलर बसवण्याच्या सूचना केल्या.

या भेटीच्यावेळी जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. जगदीश बुकतरे, फार्म अधीक्षक डॉ. भारत अस्वार, डॉ.वनकर, पशुसंवर्धनचे (Animal Husbandry) सहायक आयुक्त डॉ.बिडकर तसेच फार्मचे कर्मचारी प्रवीण गळहाट आदी उपस्थित होते.