
(Buldhana)बुलढाणा – दहा वर्षाआधी देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी दिंडीचं आयोजन केलं होतं. त्यावेळेस त्यांनी सोयाबीनला 6 हजार भाव द्या अशी मागणी केली होती. आज कापसाला 14 हजार आणि सोयाबीनला 8 हजार भाव दिला पाहिजे अशी मागणी (Former Home Minister Anil Deshmukh)माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Devendra Fadnavis)देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचं काम राज्य शासन करत आहे, असा घणाघात अनिल देशमुखांनी केला आहे. अंतरवाली सराटीमध्ये (Jarange Patil)जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान अमानुष लाठीचार्ज करण्यात आला असा अमानुष लाठी हल्ला गृहामंत्र्यांच्या आदेशाशिवाय कोणताही पोलीस अधीक्षक करू शकत नाही असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला आहे.
महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, सध्या अतिवृष्टीचा मोठा प्रश्न मोठा आहे. अशावेळेस मुख्यमंत्री भाजपच्या प्रचारासाठी तेलंगणात जात आहेत, याविषयी तीव्र नाराजी जनतेमध्ये आहे. अशी टीका अनिल देशमुखांनी केली आहे. तर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे, बेरोजगारीकडे, महागाईकडे लक्ष द्यावं, अशी विनंतीही अनिल देशमुखांनी केली आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजित पवारांना साईडलाईन करणार, हे सर्वांना माहीत आहे. पण ते आता पासूनच अजित पवारांना का साईडलाईन करतायेत, याचा पेच आम्हालाही पडला आहे. मी त्यावेळी समझोता केला असता तर माझ्यावर जेल जायची पाळीच आली नसती. आणि मी सुद्धा सरकारमध्ये सामील झालो असतो. मी पण मंत्री झालो असतो असा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केला आहे. ज्या प्रमाणे अनिल देशमुखांना त्रास झाला तसा आपल्याला होऊ नये म्हणून आमचे जुने नेते तिकडे गेले असा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केला आहे. जेल मध्ये कसा त्रास होतो, हे माझ्याकडून ऐकूनच तिकडे गेले, अशी मिश्किल टीकाही अनिल देशमुखांनी केली आहे.
सोयाबीन, कपाशीसह तूर पीकही धोक्यात; शेतकरी चिंतेत
(Amravti)अमरावती -जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका तूर पिकाला सुद्धा बसला आहे. वादळी वाऱ्याने तूर आडवी होऊन जमिनीवर पडली आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात देखील घट होणार आहे. अवकाळी पावसामुळे कापूस शेतात भिजला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा अडचणीत सापडला आहे. तर तातडीने पंचनामे करा व नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.