नागपूर- कापसाला भाव नाही,दोन वर्षांपूर्वी साडेतेरा हजार पर्यंत भाव गेले होते. आज हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करत आहे. कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याचे हालचाल दिसत नाही.कापूस खरेदी केंद्र सुरू होणार नाही, तोपर्यंत लूट सुरू राहील.ठोस पावले उचलले पाहिजे, नाहीतर पुढील काळात शेतकरी आत्महत्या करतील अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते,माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे. मविआ सरकार असताना आम्ही शेवटचे बोंड खरेदी करण्यासाठी खरेदी केली.
कारखानदारांच्या दबावाखाली सरकार पडले.शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळाला पाहिजे. कापसाला चांगला भाव मिळावा. अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं, गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष द्या अशी मागणी केली.दरम्यान, अशोक चव्हाण राजीनामा,भाजप प्रवेश संदर्भात बोलताना देशमुख म्हणाले,जर तर वर बोलून फायदा नाही.चव्हाण काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. या बातम्यांवर बोलण्यात तथ्य नाही. चर्चा होणे आणि राजीनामा देणे यात फरक आहे .मला खात्री आहे ते सोडून जाणार नाहीत, अफवा आहेत असा दावा केला. फक्त पंकजा मुंडेचं नाही सर्वच आमदार वनवासात आहेत. बाहेरून येऊन आमदार बनतात ते बोलू शकत नाही. जेव्हा सत्तेत येईल तेव्हा भाजपला हात दाखवल्याशिवाय राहणार नाही.