
नागपूर – महाराष्ट्रामध्ये ओबीसी बांधव राज्य सरकारच्या विरोधात उपोषणाला बसले आहेत. 29 सप्टेंबरला ल राज्य सरकार ओबीसी बांधवांसोबत चर्चा करणार आहे. हे पत्र आज माजी मंत्री परिणय फुके यांनी नागपुरातील संविधान चौक येथे आंदोलनस्थळी आणून ओबीसी बांधवांना दिले. यावर राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी निषेध व्यक्त केला. कारण या पत्रात 45 लोकांचे नाव आहे. राज्य शासनाने पत्रात जे नाव घेतले आहे त्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे नाव नसून केवळ भाजपच्या नेत्यांचे नाव आहे. देशमुख म्हणाले की नागपुरातील ओबीसी मोर्चात महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. परंतु या बैठकीला त्यांना न बोलवत भाजपचे माजी आमदार यांचे नावे घेतली आहेत हा प्रकार या प्रश्नाचे राजकारण करणारा आहे.