..आणि नाना पाटेकरांनी चाहत्याच्या कानशिलात लगावली!

0

वाराणसी WARANASI -आपल्या विचित्र स्वभावासाठी अभिनेते नाना पाटेकर हे प्रसिद्धच आहेत. मात्र, त्याचा फटका त्यांच्या एका चाहत्याला बसला. सेल्फी घ्यायला आलेल्या एका चाहत्याला नानांनी कानशिलात लगावल्याची घटना अलिकडेच वाराणसी येथे घडली. (Actor Nana Patekar) एका चित्रपटाच्या शूटींगसाठी नाना वाराणसीत आहेत. शूटींग सुरु असतानाच व शॉटसाठी तयार होत असतानाच एका चाहत्याने मध्येच घुसून त्यांच्यासोबत सेल्फी काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या नानांनी त्याच्या कानशिलात लगावली व त्यानंतर इतर लोकांनी त्या अतिउत्साही चाहत्याला बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.