आनंद वार्ता : मोसमी पाऊस राज्यात दाखल

0

पुणे, 11 जून  अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मोसमी पाऊस अखेर रविवारी (११ जून) दुपारी राज्यात दाखल झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरीत मोसमी पाऊस दाखल झाला असून, हलक्या आनंद सरीही सुरू झाल्या आहेत.

राज्यात सामान्यपणे मोसमी पाऊस सात जून रोजी दाखल होतो. पण, यंदा केरळमध्ये मोसमी पाऊस उशिराने म्हणजे बुधवारी (७ जून) दाखल झाला होता. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार रविवारी मोसमी वाऱ्यांनी रत्नागिरीत हजेरी लावली आहे. राज्यात मोसमी वारे दाखल होत असतानाच कर्नाटकात शिमोगा, हसनपर्यंत मोसमी वाऱ्यांनी मुसंडी मारली आहे..