

राजधानी दिल्लीत अ. भा. मराठी साहित्य संमलेन आयोजित करण्यात आले. त्यामुळे दिल्लीतील आणि महाराष्ट्राबाहेरील मराठी लोकांना यात सहभागी होता आले. हे संमलेन यशस्वी पार पडावे म्हणून राबलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो, अशा भावना राष्ट्रीय मराठी मोर्चाचे अध्यक्ष आनंद रेखी यांनी व्यक्त केल्या.
राष्ट्रीय मराठी मोर्चाचे आनंद रेखी यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढत साहित्य संमलेन आयोजक आणि साहित्यप्रेमींचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान साहित्य संमेलन दिल्लीत पार पडले.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन होते. त्यामुळे अर्थातच सगळ्यांचे लक्ष या संमेलनाकडे लागले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले.
डॉ. तारा भवाळकर संमलेनाध्यक्षा होत्या. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक नामांकित साहित्यिक, पत्रकार यामध्ये सहभागी झाले होते. देशभरातील मराठी माणूस यानिमित्ताने दिल्लीत आला होता.
सर्वांनी संमलेनात सहभाग घेतला. आम्हालाही स्वागत समितीचा सदस्य या नात्याने यामध्येो सहभागी होता आले. एवढ्या चांगल्या कार्यात खारीचा वाटा उचलता आल, असे म्हणत हे संमलेन घेणारे अ. भा. मराठी साहित्य महामंडळ आणि आयोजक संस्था सरहद, पुणे, सरहदचे प्रमुख संजय नहार यांचे आभार आणि साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या सर्व साहित्यप्रेमींचे त्यांनी आभार व्यक्त केले.