

सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून (आनंद ग्रुप फाउंडेशनच्या)वतीने खासदारांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद रेखी यांच्या विशेष पुढाकाराने मंगळवारी (ता.१७) आणि बुधवारी (ता.१८) सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजतापर्यंत खासदारांसाठी वेस्टर्न कोर्ट हॉस्टेल अनेक्स, जनपथ परिसरात शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरातून कर्करोगासंबंधी जनजागृती आणि डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग कॅम्पचे आयोजित करण्यात आला आहे. विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या आणि वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देण्यात येईल.डॉ.सुषृत सरदेशमुख, डॉ.राजेश पवार आणि डॉ.धर्मेंद्र शहा शिबिरात प्रामुख्याने उपस्थित राहतील. खासदारांना त्यांच्या व्यस्त दिनचर्येत आरोग्याची काळजी घेण्याची संधी मिळावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, डोळ्यांची तपासणी, ऑर्थोपेडिक तपासणी यांसह अनेक चाचण्या करण्यात येणार आहेत. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा वापर करण्यात येणार आहे.
आनंद रेखी यांनी सांगितले की, “सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या उपक्रमातून त्यांच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्तता होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”खासदारांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक होण्याचे आवाहनही फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. सामाजिक सेवेसाठी समर्पित असलेल्या आनंद ग्रुप फाउंडेशनने यापूर्वीही अनेक सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवले आहेत.
…..