सारथी ट्रस्टचे संस्थापक आनंद चांदराणी यांचे निधन

0

आनंद चांदराणी

समलिंगी व्यक्तींसाठी असलेल्या सारथी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आनंद चांदराणी यांचे आज दि. २७ सप्टेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते.

जीवन परिचय

समलिंगी व्यक्तींसाठी २००५ मध्ये सारथी ट्रस्ट या संस्थेची स्थापना केलेल्या आनंद चांदराणी यांनी आपले अवघे आयुष्य समलिंगी व्यक्तींच्या हक्कांसाठी लढा दिला. समलिंगी व्यक्तींच्या आरोग्य, शिक्षण व नागरी हक्कांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली, उपक्रम राबविले व जनजागरणाचे कार्य केले.
त्यांच्या पुढाकाराने विदर्भात समलिंगी व्यक्तींच्या चळवळी उभ्या झाल्या व समलिंगी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मार्ग खुले होऊ लागले.

त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव, लता मंगेशकर हॉस्पीटल, वानाडोंगरी येथे दान करण्यात आले आहे.