‘मेरी माटी मेरा देश’या उपक्रमांतर्गत निघाली अमृत कलश यात्रा

0

 

गोंदिया – भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक गावातील ग्रामपंचायत मधील माती ही दिल्ली येथे नेण्यासाठी सध्या गोंदिया जिल्ह्यामधील सर्वच आमदार आणि कार्यकर्ते हे सरसावले पाहायला मिळत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तिरोडा क्षेत्राचे आमदार विजय रांहागडाले यांनी आपल्या क्षेत्रातील असणाऱ्या 200 गावांपैकी सर्वच ग्रामपंचायतीमध्ये यात्रा फिरवून त्या ठिकाणची माती गोळा करून ती माती दिल्ली येथे नेण्याकरिता भव्य अशी यात्रा काढली आहे. या यात्रेत नागरिक सुद्धा मोठ्या उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आपल्या गावातील माती ही देत असून या मातीमुळे एकात्मतेच्या संदेश देण्याचे काम सध्या गोंदिया जिल्ह्यात तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये सुरू आहे. मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावातील माती जमा करून ही माती दिल्ली येथे पाठवण्यात येणार आहे. गावा गावामध्ये या यात्रेचे मोठ्या प्रमाणात स्वागत करून औक्षवाण करीत असल्याचे दिसून येत आहे.