
अमरावती AMRAWATI – अमरावती शहरात Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव अश्वारूढ पुतळा असणाऱ्या शहराच्या मध्यभागातील मालटेकडी अर्थात शिवटेकडीवर आता लवकरच शिवसृष्टी साकारली जाणार आहे. याच शिवसृष्टीचे आणि विकास कार्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत शिवटेकडी येथे शिवसृष्टी विकास कामाचा हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या कार्याचे भूमिपूजन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याच विकासकामांच्या कोनशिलाचे उद्घाटन सुद्धा यावेळी करण्यात आले. या विकासकामाकरिता पर्यटन विकास विभाग मार्फत 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून प्रथम टप्प्यात येथील संरक्षण भिंतीचे काम सुरु करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 1,35 कोटी निधीतून शिवाजी महाराजांच्या जीवनावर म्युरल वॉलचे काम सुरु होणार आहे यासोबतच येथे लेझर शो वॉटर फाउंटेन विद्युत रोषनाई, कामाला सुरुवात होणार. यावेळी संपूर्ण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिवटेकडी येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खा. डॉ. अनिल बोंडे, खा. नवनीत राणा, भाजपा पदाधिकारी तुषार भारतीय, मनपा आयुक्त देविदास पवार, माजी महापौर चेतन गावंडे यांच्या उपस्थितीत कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले.