पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त विदर्भस्तरीय मॅरेथॉन

0

 

अमरावती AMRAWATI – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री तथा घटना समितीचे सदस्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये 1300 स्पर्धकांनी सहभाग घेतला. आमदार यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह अन्य मान्यवरांनी सकाळी सहा वाजता हिरवी दिंडी दाखवून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेमध्ये लहान मुले, मुली, महिला, पुरुष, यासोबतच दिव्यांगांचाही मोठ्या प्रमाणात या मॅरेथॉन दौड स्पर्धेमध्ये सहभाग होता.