
अमरावती AMRAWATI – आमदार बच्चू कडू उद्या मुंबईसाठी रवाना होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आ बच्चू कडू यांनी सांगितले.
राज्यातील सर्व मराठा नावानेच ओळखले जायचे महाराष्ट्रात राहणारे मराठी म्हणजेच मराठा असं म्हटलं जायचे. मराठ्यांना आरक्षण ही सर्व मंत्रिमंडळ आणि शासनाची जबाबदारी आहे.मुदतीत शासनाने प्रगती अहवाल द्यावा नाहीतर आम्ही देखील आंदोलनात सहभागी होऊ असा इशाराही दिला. सरकारने दिलेल्या मुदतीत काय प्रगती केली ते दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे सत्य समोर आलं पाहिजे. सध्या जातीत धर्मात आणि महापुरुषांवर भांडण लावले जात आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला सारले गेलेत हे वास्तव आहे. 50 वर्षात काँग्रेसने काय केलं. असंख्य प्रश्न अजूनही सुटले नाहीत
26 डिसेंबरच्या आत आरक्षण द्यावे,
जे बोलले त्यासाठी आम्ही जरांगे पाटील सोबत आहोत.आरक्षण नाही मिळालं तर रस्त्यावर उतरू असा मराठा आरक्षणावरून बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला. दरम्यान,अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकावर झालेल्या लाठीचार्जची चौकशीची मागणी केली.